रॅपिडोची स्टार्ट अप यशोगाथा

rapido-start-up-success-story-in-marathi

ओला,उबर सारखे मोठे प्रतिस्पर्धी बाजारात आपल्यासमोर उभे असताना देखील रॅपिडोने बाईक टॅक्सी ह्या स्टार्ट अपला यशस्वी करून उत्तुंग भरारी कशी प्राप्त केली हे आपण आजच्या लेखामध्ये जाणुन घेणार आहोत.

बाजारात रॅपिडो हा स्टार्ट अप व्यवसाय अरविंद संका त्रषिकेश अणि पवन गुंटुपाली या तिघांनी मिळून बंगलौर येथे सुरू केला होता.पण त्याचवेळी बाजारात ओला (olacabs) अणि उबर (uber) खुप वेगाने प्रगती करत होते.

ओला उबर यांनी ऑटो रिक्षेच्या व्यवसायाला देखील बाजारात हादरवून सोडले होते.बाजारातील होत असणारे हेच परिवर्तन बघुन रॅपिडोने देखील स्वताचे ऍप लाॅच करण्याचे ठरवले.

पण रॅपिडोला ओला तसेच उबर सारखे बनायचे नव्हते बाजारात त्यांना काहीतरी युनिक करायचे होते याचकरीता रॅपिडोने बाईक टॅक्सी लाॅच केली.

रॅपिडोची ही कल्पना अत्यंत यशस्वी ठरली कारण बाईक टॅक्सीमुळे ट्रॅफिक जॅम मध्ये अडकण्याच्या समस्येपासून लोकांना सुटका मिळणार होती.लोकांचा वेळ अणि पैसा वाचणार होता.अणि ध्वनी प्रदुषण देखील कमी होणार होते.

अणि बाईक टॅक्सीचे चार्जेस ओला अणि उबरच्या तुलनेत खुप स्वस्त देखील होते.त्यामुळे प्रवासींनी बाईक टॅक्सीने प्रवास करण्याला अधिक प्राधान्य दिले.

पुढे व्यवसायात चांगली वाढ झाल्यावर रॅपिडोने अल्लु अर्जुन अणि रणवीर सिंग यांसारख्या दिग्गज सेलिब्रिटींदवारे बाजारात आपल्या व्यवसायाची जाहिरात तसेच मार्केटिंग देखील केली.

ज्यामुळे पुढे जाऊन रॅपिडो खुप जलदगतीने बाईक टॅक्सी व्यवसायात आघाडीवर येऊन पोहोचले.

आज बाजारात रॅपिडोचे दीड करोडपेक्षा अधिक नोंदणीकृत वापरकर्ते आहेत.अणि पाच लाखांपेक्षा अधिक ट्रीप रोज रॅपिडो दवारे पुर्ण केल्या जात आहेत.

रॅपिडो ही एक बाजारात प्रवासींना ये-जा करण्यासाठी दुचाकी भाडयाने देणारी कंपनी आहे.

रॅपिडो बाजारातील ही पहिली कंपनी होती जी दुचाकी भाडयाने देण्यासाठी बाजारात घेऊन आले होती.पण त्याच्या काही महिन्यातच बाजारात ओला उबर सारख्या टॅक्सी भाड्याने देत असलेल्या कंपनी उतरल्या.

ज्यामुळे रॅपिडोचा बाजारातील पहिल्या हालचालीचा फायदा काही महिन्यातच संपुष्टात आला होता.त्यामुळे रॅपिडोचे अरविंद संका संस्थापक जिथेही गुंतवणूक दारांकडुन निधी मागण्यासाठी जात होते.

त्यांना गुंतवणूक दारांकडुन हाच एक प्रश्न विचारला जात होता की ओला उबर सारख्या प्रतिस्पर्धी समोर बाजारात रॅपिडो कशी तग धरणार.रॅपिडोचा टिकाव कसा लागणार?

हा प्रश्न देखील योग्यच होता कारण सुरूवातीला रॅपिडोला बाजारात रोजच्या पाचशे स्वारी प्राप्त करण्यासाठी एक ते दोन महिने इतका कालावधी लागला होता.

तसेच आपले ऍपचे वापरकर्त्यांकडुन दहा हजार डाऊनलोड पुर्ण करण्यासाठी देखील एक ते दोन महिने इतका कालावधी लागला होता.

सुरूवातीला ह्या ऍपची डिझाईन कॅब करीता बुकिंग करतात एकदम त्याचप्रमाणे करण्यात आली होती.

ज्यात कुठलाही ग्राहक आपल्या जवळील परिसरातील पिक अप डेस्टिनेशन सर्वप्रथम इंटर करत असे.मग तो आपली राईड बुक करत.

मग राईड बुक केल्यानंतर काही सेकंदात त्या एरियातील रायडरचा संपर्क क्रमांक अणि फोटो बाईक क्रमांक त्याला पाठविला जात असे.रॅपिडोमध्ये बाईक चालवत असलेल्या राईडरला कॅप्टन असे म्हटले जात असे.असे बिझनेस माॅडेल सुरूवातीला रॅपिडोचे होते.

सर्वप्रथम रॅपिडोच्या बाईक राईड मध्ये संस्थापकांना ही गोष्ट लक्षात आली की ग्राहकांसाठी काही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत.

जसे की त्यांची प्रणाली विश्वसनीय असणे आवश्यक आहे अणि ग्राहकांसाठी ही प्रणाली नेहमी उपलब्ध असणे आवश्यक आहे.

कारण सुरूवातीला रॅपिडोकडे खुप कमी राईडर्स होते त्यामुळे सुरूवातीला ग्राहकांना त्यांच्या सेवेत खराब अनुभव प्राप्त होत होता.

कारण जेव्हा ग्राहक आपल्या जवळील परिसरात बाईक राईड बुक करत होते तेव्हा त्यांना आपल्या जवळील परिसरात लगेच राईड उपलब्ध होत नव्हती.

पण निरीक्षणातुन कंपनीला ही गोष्ट देखील लक्षात आली की रॅपिडोची बाईक राईड सेवा प्रणाली चांगली असल्याने बाईक बुक केल्यानंतर थोड्यावेळ वाट पाहावी लागली तरी देखील कित्येक ग्राहक राईडची वाट पाहत होते.

इथूनच रॅपिडोला आपल्या स्टार्ट अप मध्ये काही सकारात्मक प्रतिसाद प्राप्त झाला.मग त्यांनी आपल्या अॅपमध्ये स्नुज बटण नावाचा एक पर्याय सुरू केला.

याने ग्राहकाने बाईक राईड बुक केल्यानंतर त्याच्या परिसरात बाईक राईड उपलब्ध नसेल तर अशा परिस्थितीत स्नुज बटण दाबल्यावर ग्राहकांना दहा मिनिटांच्या आत कुठुनही राईड उपलब्ध करून दिली जात होती.

रॅपिडोच्या ह्या बदलाला ग्राहकांकडून खूप चांगला प्रतिसाद देखील मिळाला.

पुढे २०१६ मध्ये रॅपिडोला आपल्या व्यवसायाचा विस्तार करायचा होता पण त्यांच्याकडे पुरेसा निधी उपलब्ध नव्हता अणि गुंतवणूक दार गुंतवणूक करायला देखील तयार नव्हते.

तेव्हा हिरो मोटरकपचे सीईओ पवन गुंजाल यांनी आपल्या वैयक्तिक निधीतुन निधी उपलब्ध करून दिला.पवन गुंजाल यांनी रॅपिडोला फंड देताना सांगितले की त्यांनी टायर टु अणि टायर थ्री शहरात त्यांनी आपल्या उद्योग व्यवसायाचा विस्तार करायला हवा.

कारण त्यांचे असे मत होते की येत्या काळात रॅपिडोला तिथे एक चांगली संधी प्राप्त होऊ शकेल.याचसोबत पवन गुंजाल यांनी हा प्रश्न देखील उपस्थित केला की तुम्ही महिलांना ह्या व्यवसायात समाविष्ट नाही केले तर ह्या व्यवसायाचा विस्तार कसा होईल?

कारण महिलांचा खूप मोठा गट प्रवाशांमध्ये समाविष्ट होता.मग रॅपिडोच्या लक्षात आले की त्यांना आपल्या उद्योग व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी महिलांना देखील यात समाविष्ट करावे लागेल.

कारण भारतातील पारंपारिक परंपरेनुसार कुठलीही महिला तेव्हा पुरूष राईडरच्या बाईकवर मागे बसत नव्हती.

मग भारतातील ही जुनी परंपरा मोडीत काढण्यासाठी रॅपिडोने आपल्या जाहीरातीतुन लोकांना हे दाखवले की कशा पद्धतीने महिला राईडर्स बाईकवरून सुरक्षितपणे बाईक चालवून पुरूषांना तसेच महिलांना आपल्या गंतव्य स्थळी पोहचवते.

ज्यामुळे वेगवेगळ्या राज्यातील महिला ह्या व्यवसायात उतरू लागल्या अणि रॅपिडो मध्ये कॅप्टन म्हणून बाईक राईड करू लागल्या.

अणि बाईक सर्विस देऊन चांगली कमाई देखील करू लागल्या.पुढे जे गुंतवणूकदार रॅपिडो मध्ये गुंतवणूक करायला तयार नव्हते ते देखील गुंतवणूक करायला तयार झाले.

कारण गुंतवणूकदारांना देखील कळु लागले की भारतामध्ये देखील दुचाकी भाडयाने चालविण्याची नुकतीच सुरूवात झाली आहे.अणि हा स्टार्ट अप व्यवसाय प्राथमिक स्तरावर होता.

ज्यात रॅपिडोने बाजारात संपूर्णत पकड प्राप्त केली आहे असे असल्यास पुढच्या पाच सहा वर्षांत बाजारात रॅपिडोचे वर्चस्व प्रस्थापित होईल.

२०२१ मध्ये रॅपिडो बाईक राईड भारतातील एकुण ९५ शहरात होती.अणि याचे १.५ करोड पेक्षा अधिक वापरकर्ते देखील झाले होते.

आतापर्यंत १५ लाखापेक्षा अधिक कॅप्टनने रॅपिडोला जाॅईन केले आहे अणि ३० मिलियन पेक्षा अधिक गुंतवणूक दारांकडुन यात फंडिग देखील करण्यात आली आहे.

आपल्या ह्या उत्तुंग यशामुळे रॅपिडोने आज बाजारात ओला उबर सारख्या टॅक्सी भाड्याने देत असलेल्या दिग्दज कंपनींना मागे टाकले आहे.

सुरूवातीचे तीन वर्षे रॅपिडोकडे रायडर्सची मोठी टीम नसल्याने त्यांनी आपल्या ग्राहकांचा प्रतिसाद अणि रायडर्सचा प्रतिसाद प्राप्त करूनच आपल्या व्यवसायाला एक दिशा देणे सुरू केले होते.

सुरूवातीच्या तीन वर्षांत रॅपिडोने आपली आॅर्डर व्यवस्थापन प्रणाली मजबूत करण्यावर अधिक भर दिला.

ज्यात त्यांनी ह्या गोष्टीवर विशेष लक्ष केंद्रित केले की राईडर्स सोबत ग्राहक कसा बसणार कसा पुढे जाणार त्याचे सर्व व्यवस्थापन कसे होईल ह्या प्रक्रियेवर सुरूवातीचे तीन वर्षे रॅपिडोने विशेष लक्ष दिले.

तसे पाहायला गेले तर एका राईडसाठी रॅपिडोला खुप कमी पैसे प्राप्त होत होते पण एकाच दिवसात हजारो राईड उपलब्ध होत असल्याने ह्या व्यवसायातुन रॅपिडोची खूप कमाई झाली.

२०१८ मध्ये रॅपिडोला एका दिवसात पाच हजार राईडस प्राप्त होण्यास सुरुवात झाली होती.पुढे २०१९ मध्ये रॅपिडोला एका दिवसाला पाच लाख राईडस प्राप्त होण्यास सुरुवात झाली होती.कारण रॅपिडोने सुरूवातीचे तीन वर्षे आपल्या व्यवस्थापन अणि प्रक्रियेवर अधिक लक्ष केंद्रित केले.

रॅपिडोच्या एका राईड मधुन जी काही कमाई होते त्यातील २० टक्के कंपनी स्वताला ठेवते अणि बाकी आपल्या ड्रायव्हरला देऊन टाकते.

रॅपिडो बाईक टॅक्सी सर्विसमुळे ग्राहक अणि बाईक ड्राइव्हर दोघांना फायदा झाला.कारण बाईक टॅक्सी ड्रायव्हिंग करून बाईक चालकांना एका दिवसात १५०० ते २००० हजार इतकी कमाई करता येत होती.

याचसोबत ग्राहकांना देखील कमी पैशात ट्रॅफिक जॅमचा त्रास सहन न करता सुखद प्रवास करायला मिळत होता.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top