बायजुस स्टार्ट अप व्यवसायाची यशोगाथा

Byjus Start Up Business Success Story

बायजु हे बायजु रविंद्रन यांनी सुरू केलेले भारतातील एक टाॅप एड टेक स्टार्ट अप आहे.

बायजु रविंद्रन यांचा जन्म १९८० केरळ मधील अझिकोडा नावाच्या एका छोट्याशा गावात एका मल्याळम कुटुंबात झाला होता.

बायजु रविंद्रन यांचे आईवडील दोघेही शिक्षक होते.त्यांची आई मॅथ अणि वडील फिजिक्स हे विषय विद्यार्थ्यांना शिकवत असे.

बायजु रविंद्रन यांनी आपले प्राथमिक शिक्षण अझिकोडा येथील एका मल्याळम माध्यमिक शाळेतून पूर्ण केले.यानंतर कालिकत युनिव्हसिर्टी मधुन सरकारी इंजिनिअरिंग महाविद्यालय कन्नोर मधुन त्यांनी मॅकेनिकल इंजिनिअरिंगची पदवी देखील प्राप्त केली.

बायजु रविंद्रन यांना लहानपणापासूनच खेळाची खूप आवड होती.आपल्या महाविद्यालयीन जीवनात त्यांनी क्रिकेट, फुटबॉल, बास्केटबॉल बॅटमिंटन इत्यादी खेळ खेळले.

पण त्यांना आपले करीअर इंजिनिअरिंग मध्ये करायचे होते म्हणून त्यांनी मॅकेनिकल इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त केली.

इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर बायजु रविंद्रन यांना एका मल्टीनॅशनल कंपनीत सर्व्हिस इंजिनिअर पदावर नोकरी मिळाली.

एका टयुशन टीचरने कशी सुरु केली १,५०,००० करोडची कंपनी?

बायजुस रविंद्रन यांनी कॅटमध्ये १०० टक्के इतकी टक्केवारी प्राप्त केली होती.एवढी भरघोस टक्केवारी असल्याने त्यांना नोकरीसाठी अर्ज केल्यावर एका चांगल्या कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी देखील प्राप्त झाली.

पण कंपनीने बायजु रविंद्रन यांना दोन महिन्यांनंतर जाॅबवर जाॅईन होण्यास सांगितले.बायजु रविंद्रन यांना इतर विद्यार्थी म्हणु लागले तुला कॅट मध्ये शंभर टक्के प्राप्त झाले आहे तुझे नाॅलेज इतके चांगले आहे तु आम्हाला देखील शिकवशील का?

बायजु रविंद्रन अभ्यासात हुशार असल्याने त्यांचे सर्व मित्र त्यांच्याकडून अभ्यासासाठी सल्ला घेत असत.बायजु रविंद्रन यांचे मॅथेमॅटिक्स खूप उत्तम होते.म्हणुन त्यांनी आपल्या मित्रांच्या सल्ल्यावरून टयुशन घेऊन इतर मुलांना मॅथेमॅटिक्स हा विषय शिकवण्यास सुरूवात केली.

सुरूवातीला जवळ टयुशनसाठी चांगली जागा उपलब्ध नसल्याने त्यांनी मुलांना आपल्या एका मित्राच्या गच्चीवर बसुन टयुशन देण्यास सुरुवात केली.

सुरूवातीला त्यांनी एमबीए इच्छुकांना शिकवले नंतर त्यांनी फुलटाईम कोचिंग क्लासेस घेणे सुरू केले.पहिला एक आठवडा त्यांनी मुलांना फ्री मध्ये शिकवले.

ज्यात त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले एक हप्ता तुम्ही टयुशन घ्या यानंतर तुम्हाला माझे शिकवणे आवडले तर मग माझ्याकडे ट्युशन कंटिन्यु करून फी द्या.

बायजु रविंद्रन यांनी मित्राच्या घराच्या छतावर टयुशन देण्यास सुरुवात केली पण पुढे त्यांनी मुलांना कलासरूम मध्येच नव्हे तर मोठमोठ्या सभागृहात देखील शिकवले.

आॅनलाईन टेक्नॉलॉजीचा वापर केल्याने तसेच आपल्या शिकवण्याच्या युनिक शैलीमुळे ते इतके प्रसिद्ध झाले की बायजु रविंद्रन यांच्याकडे मुंबई, दिल्ली,पुणे, चेन्नई इत्यादी ठिकाणचे २० हजारपेक्षा अधिक विद्यार्थी टयुशन घेऊ लागले.

म्हणजेच नोकरीवर जाॅईन होईपर्यंत दोन महिने बसुन राहण्यापेक्षा बायजुस रविंद्रन यांनी इतर मुलांना टयुशन देणे सुरू केले.

आपल्या दोन महिन्यांच्या रिकाम्या वेळात बायजुस रविंद्रन यांनी आॅनलाईन इतर मुलांचे क्लासेस घेणे सुरू केले.

सुरूवातीला बायजुस रविंद्रन यांनी एका मुलाला शिकवले मग दुसरया मुलाला शिकवले असे करत करत दोन महिन्यांत बायजुस रविंद्रन टयुशन देऊन इतकी कमाई करू लागले जितकी त्यांना कुठल्याही जाॅब मध्ये प्राप्त होऊ शकत नव्हती.

म्हणून बायजुस रविंद्रन यांनी फुलटाईम टयुशन घेण्याचा निर्णय घेतला.फुलटाईम टयुशन क्लासेस घेताना त्यांचे नाव देशातील अकरा शहरांमध्ये जाऊन पोहोचले.मग देशातील वेगवेगळ्या शहरातील विद्यार्थी बायजुस रविंद्रन यांच्याकडे आॅनलाईन टयूशन घेऊ लागले.

विदयार्थी वर्गाकडून आपल्या टयुशन क्लासेसला एवढा चांगला प्रतिसाद मिळत असलेला बघुन बायजु रविंद्रन यांनी २०११ मध्ये एका कंपनीची सुरूवात केली.जिचे नाव होते थिंक अॅण्ड लर्न.

यानंतर देखील विद्यार्थी वर्गाकडून अधिक प्रतिसाद प्राप्त झाल्यामुळे बायजु रविंद्रन यांनी स्वताच्या नावाने २०१५ मध्ये एक अॅप देखील लाॅच केले.ज्याचे नाव बायजुस लर्निग अॅप असे होते.

हे अॅप बनविण्यासाठी जवळपास चार वर्षे इतका कालावधी लागला होता.हया अॅपवर सर्व इयतेच्या विद्यार्थ्यांना शिकवले जात असे.

याचसोबत ह्या अॅपवर कॅट,जेईई,नीट इत्यादी परीक्षांची तयारी देखील करून घेतली जात असे.

बायजुस हे अॅप एका वर्षात ५५ लाखापेक्षा अधिक युझर्सने डाऊनलोड देखील केले.बायजुस एशिया मधील एकमेव असे स्टार्ट अप आहे ज्याचे फेसबुकचे संस्थापक फंडिग मार्क झुकरबर्ग करतात.

बायजु रविंद्रन यांच्या यशोगाथेतुन एक गोष्ट शिकायला मिळते बायजु रविंद्रन यांना ज्यावेळी जे काही उत्तम करता आले ते त्यांनी केले.जी संधी त्यांना प्राप्त झाली तिचा त्यांनी फायदा उठविला.

भविष्यात एकेदिवशी मी हे करणार ते करणार याचा विचार न करता मी आज वर्तमानात काय करू शकतो यावर त्यांनी विशेष लक्ष केंद्रित केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top