सुरूवातीच्या काळात आपल्याला न्युज बघण्यासाठी वर्तमानपत्र वाचावे लागत असे किंवा टीव्हीवर रेडिओवर न्युज ऐकावी लागत असे.
पण आता देश डिजीटल झाल्यामुळे कुठलीही न्युज आपण मोबाईलवर देखील प्राप्त करून वाचू शकतो.डेली हंट ही अशीच एक आॅनलाईन न्युज पब्लिश करणारी ई न्युज अॅप आहे.
डेली हंट न्युज अॅपवर किंवा त्यांच्या वेबसाइटवर आपल्याला काही मिनिटांत नवनवीन अणि ट्रेडिंग न्युज वाचायला मिळतात.डेली हंटचे नाव आधी न्युज हंट असे होते.२०१५ मध्ये याचे नाव डेली हंट न्युज असे ठेवण्यात आले होते.
डेली हंट न्युजची सुरूवात कशी झाली ?
डेली हंट न्युज अॅप नोकिया कंपनी मध्ये काम करत असलेले कर्मचारी उमेश कुलकर्णी,चंद्रशेखर सहाणी ह्या दोघांनी २००९ मध्ये सुरू केले होते.
सुरूवातीला हे अॅप फक्त नोकिया मोबाईलवर उपलब्ध होते.यानंतर हे अॅप अॅड्राॅईड अॅपवर उपलब्ध करून देण्यात आले होते.
कालांतराने पुढे व्हर्स कंपनीचे संस्थापक विरेंद्र गुप्ता यांनी डेली हंटला २०१२ मध्ये टेक ओव्हर करून घेतले.
भारतातील ७० टक्के लोकाना इंग्रजी वाचता येत नव्हते म्हणून विरेंद्र गुप्ता यांना असा एक न्युज प्लॅटफॉर्म तयार करायचा होता जिथे भारतातील लोकांना आपल्या लोकल भाषेत न्युज वाचता येईल.
डेली हंट न्युजला अधिक उत्तम बनविण्यासाठी विरेंद्र गुप्ता यांनी आपल्या टीममध्ये उमंग बेदी अणि शैलेंद्र शर्मा यांना देखील आपल्या टीममध्ये समाविष्ट करून घेतले.
डेली हंट न्युज प्लॅटफॉर्म हे वाचकांना मोबाईलवर वाचण्यासाठी विपुल प्रमाणात ई न्युज उपलब्ध करून देते.डेली हंट न्युज मध्ये वाचकांना भारतातील चौदा पेक्षा अधिक लोकल भाषेत न्युज वाचता येतात.
२०२० मध्ये डेली हंट न्युजने युनिकाॅन क्लब मध्ये देखील प्रवेश केला होता.२०२२ मध्ये डेली हंटची कमाई ९६५ करोड रुपये इतकी झाली होती.
२०१४ मध्ये डेली हंट न्युजला सर्वात जास्त फंडिंग प्राप्त झाली होती.आतापर्यत डेली हंट न्युजने ३ हजार मिलियन डॉलर पेक्षा अधिक फंडिंग प्राप्त केली आहे.
डेली हंट न्युज मध्ये आतापर्यंत मायक्रोसॉफ्ट गुगल सारख्या दिग्दज कंपनींने देखील आपले पैसे गुंतवले आहेत.