ड्रीम ११ हे एक अॅड्राॅईड मोबाईल अॅप्लीकेशन आहे.हे अॅप्लीकेशन हर्ष जैन अणि त्यांचे भावित सेठ ह्या दोघांनी मिळून बनवले होते.
ड्रीम ११ अॅपची सुरूवात २००८ मध्ये करण्यात आली होती.हर्ष जैन यांचे वडील आनंद जैन हे स्वता एक करोडपती व्यक्ती आहेत.हर्ष जैन यांचे वडील आनंद जैन यांच्या कंपनीने २०२० मध्ये १२० करोडपेक्षा अधिक पैशांची कमाई केली होती.
हर्ष जैन यांचे वडील करोडपती व्यक्ती असुन देखील हर्ष जैन यांना आपल्या वडिलांकडून एक रूपयाची देखील आर्थिक मदत न घेता स्वताची कंपनी सुरू करायची होती.
हर्ष जैन अणि भावित सेठ हे दोघेही फुटबॉल फॅन्टसी लिगचे मोठे प्रशंसक होते.म्हणुन भारतात देखील असेच काही व्हावे असे त्यांचे म्हणणे होते.
हर्ष जैन यांना खुप रिसर्च केल्यावर हे कळले की भारतात क्रिकेटची इतकी अधिक क्रेझ लोकांना आहे तरी देखील भारतात एकही आॅनलाईन फॅन्टसी लिग नाहीये.
त्यांनी विशेषतःआयपीएलकरीता ड्रीम ११ ला जाहीरात आधारीत माॅडल सारखे बनवले होते.पण त्यात त्यांना पाहीजे तितके यश प्राप्त झाले नाही.
मग पुढे २०१२ मध्ये कंपनीने ठरविले की ते एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांवर अधिक लक्ष केंद्रित करतील.अणि युझर्सला पैशांसोबत खेळण्यास प्रोत्साहित करायला हवे.
२०१४ मध्ये ड्रीम ११ कंपनीला कलारी कॅपिटलकडुन पहिली फंडिग प्राप्त झाली होती.ज्यामुळे ह्या कंपनीला आपल्या व्यवसायासाठी अधिक पैसे खर्च करता आले.
ड्रीम ११ कंपनीच्या सल्लागाराची भुमिका पार पाडत असलेल्या सोशल मीडियावर असे सांगितले होते की हर्ष जैन यांना एक मिलियन डॉलर इतकी गुंतवणूक प्राप्त करण्यासाठी खुप खटाटोप करावी लागली होती.
त्यांना फायनान्स करीता अधिकतम सेल्सपर्सन सोबत कित्येक तास चर्चा केली तरी देखील त्यांना त्याचा काही फायदा झाला नव्हता.
अशा वेळी हर्ष जैन यांना आपल्या वडिलांकडून स्वताचा उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी सहजासहजी मदत प्राप्त झाली असती पण त्यांनी तसे नाही केले.
हर्ष जैन यांना ड्रीम ११ ला स्वताची ओळख बनवायचे होते म्हणून त्यांनी कोणालाही हे सांगितले नाही की ते करोडपती उद्योजक आनंद जैन यांचे सुपुत्र आहेत.
पुढे ड्रीम ११ कंपनीला चांगले यश प्राप्त होऊ लागले सुरूवातीला ड्रीम ११ च्या युझर्सची तीन लाखाच्या आसपास झाली.आज ह्या कंपनीचे आठ करोडपेक्षा अधिक युझर्स असल्याचे दिसून येते.
फक्त सहा वर्षांच्या कालावधीत ड्रीम ११ ह्या कंपनीने यशाचे शिखर गाठले आहे.ड्रीम ११ भारतातील एकमेव अशी स्पोर्टस फॅन्टसी कंपनी आहे जिचे मुल्य १०० करोडपेक्षा अधिक आहे.
इकोनाॅमिक टाईम्सच्या रिपोर्ट नुसार ड्रीम ११ कंपनीने २०१८ मध्ये २३० करोड रुपये अणि २०१९ मध्ये ८०० करोड इतकी कमाई केली होती.म्हणजे अवघ्या एका वर्षात कंपनीच्या कमाई मध्ये खूप वाढ झाल्याचे दिसून येते.
पण हे यश प्राप्त करण्यासाठी हर्ष जैन अणि भावित सेठ यांना कठोर संघर्ष करावा लागला होता कारण फॅन्टसी प्लॅटफॉर्मवर राज्य करण्याच्या आधी याला बाजारात खूप संघर्ष करावा लागत असे.
२०१७ मध्ये ड्रीम ११ ह्या अॅपवर खेळाडुंनी जुगार खेळणारी अॅप म्हणून ह्या अॅपला विरोध देखील केला होता.
पण भारतीय सर्वोच्च न्यायालयाने असे सांगितले की ड्रीम ११ हे खेळाडूंच्या विश्लेषणात्मक कौशल्यांवर परिणाम ठरवते.
यात उपयोगकर्ताला खेळाडूच्या रूपात मागील कामगिरी अणि विविध बाबींच्या आधारावर निर्णय घ्यावा लागतो त्यामुळे हे कायदेशीर आहे.त्यामुळे याला बंदी घालण्यात येणार नाही.
पण आज देखील भारतातील काही राज्यात ह्या अॅपला परवानगी देण्यात आली नाहीये.
भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार,यष्टिरक्षक महेंद्रसिगं धोनी हे ड्रीम ११ चे ब्रॅड अॅम्बेसेडर आहेत.महेंद्रसिंग धोनी यांनी २०१८ मध्ये इंडियन प्रीमियर लीग दरम्यान बनविण्यात आलेल्या दिमाग से धोनीचे मिडिया अभियान सुरू केले होते.
महेंद्रसिगं धोनी ह्या अॅपचे ब्रॅड अॅम्बेसेडर असल्याने ह्या अॅपला खुप प्रसिद्धी मिळाली.याचसोबत भारतीय क्रिकेट संघातील रोहीत शर्मा,जसमित बुमराह,शिखर धवन,हार्दिक पांडया यांनी देखील ड्रीम ११ चे ब्रॅड अॅम्बेसेडर बनुन याला बाजारात प्रमोट केले होते.
आज ही अॅप १० करोडपेक्षा अधिक लोकांनी प्ले स्टोअर वरून डाऊनलोड केली आहे.
ड्रीम ११ कंपनीने प्राप्त केलेले यश
२०१७ मध्ये ड्रीम ११ कंपनीने क्रिकेट, फुटबॉल, बास्केटबॉल मध्ये तीन लीग सोबत भागीदारी केली होती.
ड्रीम ११ हिरो कॅरेबियन प्रीमियर लीग,हिरो इंडियन सुपर लिग, नॅशनल बास्केटबॉल असोसिएशन करीता अधिकृत फॅन्टसी पार्टनर देखील बनले होते.यानंतर त्यांनी हिरो इंडियन सुपर लिग सोबत अधिकृत फॅन्टसी पार्टनर म्हणून भागीदारी केली.
२०१७ मध्ये अमेरिका मधील प्रोफेशनल बास्केटबॉल लीगने नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनने ड्रीम ११ सोबत मिळून एक फॅन्टसी बास्केटबॉल गेम देखील लाॅच केला होता.
यानंतर २०१८ मध्ये ड्रीम ११ कंपनीने आयसीसीसोबत पार्टनरशिप केली.तसेच २०१८ मध्ये ड्रीम ११ ने आपल्या प्लॅटफॉर्मवर कबडडी अणि हाॅकी हे दोन नवीन खेळ समाविष्ट केले.
२०१९ मध्ये भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डने ड्रीम ११ ला आपल्या प्रीमियर लीगचे अधिकृत भागीदार म्हणून घोषित केले.अणि आज देखील ड्रीम ११ कंपनी दरवर्षी ७८० करोड रुपये दरवर्षी कमाई करत आहे.