गोंदिया हा जिल्हा आपल्या महाराष्ट्र राज्यातील प्रमुख जिल्ह्यांपैकी एक आहे.गोंदिया जिल्हा भारतातील छत्तीसगड आणि मध्य प्रदेश ह्या दोन्ही राज्यांच्या लगत आहे.
गोंदिया जिल्ह्यातील कित्येक जमीनी जंगल क्षेत्राने व्यापलेल्या आपणास दिसून येतात.गोंदिया ह्या जिल्ह्यातुन महाराष्ट् राज्यातील पैनगंगा ही प्रमुख नदी वाहताना दिसते.
गोंदिया ह्या जिल्ह्यात आपल्याला अनेक नैसर्गिक अणि धार्मिक पर्यटनस्थळ पाहायला मिळतात.येथील नैसर्गिक अणि धार्मिक पर्यटनस्थळ बघण्यासाठी महाराष्ट् राज्यातील कित्येक पर्यटक ह्या जिल्ह्यात येत असतात.
मुंबई पासुन १०६० किलोमीटर इतक्या अंतरावर हा जिल्हा आहे.गोंदिया जिल्ह्यात सभोवताली उंच डोंगर, टेकड्यांच्या रांगा अणि विस्तीर्ण जंगल आहेत तसेच ह्या ठिकाणी आदिवासींचे वास्तव्य आहे.
गोंदिया ह्या जिल्ह्याला सर्वत्र तलावांचा जिल्हा ह्या नावाने देखील ओळखले जाते.गोंदिया ह्या जिल्ह्यात हजारो वर्षांचा प्राचीन इतिहास लाभलेली महत्वाची ठिकाणे देखील दिसुन येतात.
आजच्या लेखात आपण गोंदिया जिल्ह्यातील १० महत्वाची पर्यटन स्थळे कोणकोणती आहेत हे जाणून घेणार आहोत.
हाजरा धबधबा –
हाजरा धबधबा हे गोंदिया जिल्ह्यातील एक महत्वाचे पर्यटन स्थळ आहे.
गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा ह्या तालुक्यात हा धबधबा आपणास पाहावयास मिळतो.पावसाळयात ह्या धबधब्याचा आनंद घेण्यासाठी अनेक पर्यटक इथे भेट देतात.
हाजरा ह्या समुद्राच्या किनाऱ्याचा परिसर आपणास अगदी निसर्गसंपन्न असल्याचे दिसून येते.हया धबधब्याच्या आजुबाजुला असलेला परिसर देखील पर्यटकांचे मन वेधून घेतो.
गोंदिया शहरापासून हाजरा धबधबा ५० किलोमीटर इतक्या अंतरावर आहे.
सुर्यदेव मांडव देवी मंदिर-
सुर्यदेव मांडव देवी मंदिर हे गोंदिया जिल्ह्यातील काही प्रमुख ठिकाणांपैकी एक मानले जाते.
गोंदिया जिल्ह्यातील सुर्यदेव अणि मांडव देवी मंदिर हे एका टेकडीवर आहेत.सुर्यदेव हे मंदिर सुर्यदेवासाठी अणि मांडव देवी मंदिर दुर्गा देवीसाठी प्रसिद्ध आहे.
असे सांगितले जाते की जे भाविक दर्शनासाठी येतात त्यांची मनोकामना पूर्ण होतेच.हे पुर्ण मंदिर काळ्या पाषाणाच्या दगडांनी बांधण्यात आले आहे.
भाविक सकाळी ६ वाजेपासून रात्री ९ वाजेपर्यंत ह्या मंदिराला भेट देण्यासाठी येतात.
गोंदिया शहरापासून हे मंदिर साधारणतः २६ किलोमीटर इतक्या अंतरावर आहे.
पदमपुर –
पदमपुर हे ठिकाण गोंदिया जिल्ह्यातील एक महत्वाचे पर्यटन स्थळ आहे.पदमपुर हे गाव गोंदिया जिल्ह्यातील खामगाव ह्या तालुक्यात आहे.
पदमपुर गावाच्या अवतीभवती आपणास वेगवेगळ्या प्रकारच्या प्राचीन मुर्ती पाहावयास मिळतात.गोंदिया शहरापासून पदमपुर हे ठिकाण साधारणतः २८ किलोमीटर इतक्या अंतरावर आहे.
नागरा –
नागरा हे गोंदिया जिल्ह्यातील एक प्रसिद्ध मंदिर आहे.नागरा हे गोंदिया जिल्ह्यातील प्रमुख ठिकाणांपैकी एक मानले जाते.
नागरा ह्या ठिकाणी भगवान शंकराला समर्पित करण्यात आलेले एक प्रसिद्ध असे शिवमंदिर आहे.हे मंदिर नागरा शिवमंदिर ह्या नावाने देखील ओळखले जाते.
नागरा हे मंदिर पंधराव्या शतकात निर्माण करण्यात आले होते.हया मंदिराचे पुर्ण बांधकाम आपणास हेमाडपंथी पद्धतीने केलेले दिसुन येते.
कित्येक पर्यटक भक्तजण ह्या मंदिरात रोज दर्शनासाठी येतात.गोंदिया शहरापासून हे नागरा शिवमंदिर पाच ते सहा किलोमीटर इतक्या अंतरावर आहे.
प्रतापगड –
प्रतापगड हे गोंदिया जिल्ह्यातील एक महत्वाचे ठिकाण आहे.हे ठिकाण गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यात आहे.
दरवर्षी प्रतापगड येथे महाशिवरात्रीला उत्सव साजरा केला जातो.संपुर्ण गोंदिया जिल्ह्यातील लोक ह्या उत्सवात सहभागी होत असतात.
प्रतापगड ह्या ठिकाणी आपणास ३० फुट उंच इतकी शंकराची मुर्ती बसवलेली दिसून येते.गोंदिया शहरापासून हे ठिकाण ८६ किलोमीटर इतक्या अंतरावर आहे.
चुलबंध धरण-
चुलबंध धरण हे गोंदिया जिल्ह्यातील प्रमुख ठिकाणांपैकी एक मानले जाते.चुलबंध धरण गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यात आहे.
ह्या धरणाच्या आजुबाजुला असलेल्या निसर्गसंपन्न वातावरणाचा आनंद घेण्यासाठी आपण ह्या ठिकाणाला भेट देऊ शकतात.चुलबंध धरणाला भेट देण्यासाठी कित्येक पर्यटक इथे येतात.
गोंदिया शहरापासून चुलबंध धरण जवळपास २५ किलोमीटर इतक्या अंतरावर आहे.
इडियाडोह धरण-
इडियाडोह धरण हे गोंदिया जिल्ह्यातील काही अत्यंत प्रमुख ठिकाणांपैकी एक आहे.हे धरण गोंदिया जिल्ह्यातील अर्जुन ह्या गावात वसलेले आहे.
हे धरण गाडविया नदीवर बांधण्यात आले आहे.हया धरणाच्या जवळील परिसर निसर्गसंपन्न असा आहे.गडचिरोली तसेच गोंदिया जिल्ह्यातील अनेक पर्यटक ह्या धरणाला भेट देण्यासाठी इथे येतात.
कचारगड गुहा –
कचारगड गुहा हे ठिकाण गोंदिया जिल्ह्यातील प्रमुख पर्यटनस्थळांपैकी एक आहे.
कचारगड येथे आपणास जवळपास २५ हजार वर्षे इतक्या जुन्या गुफा पाहायला मिळतात.हे ठिकाण घनदाट जंगलाने वेढलेले आहे.
महाराष्ट्र राज्यातील अनेक पर्यटक ट्रेकर्स ह्या ठिकाणी ट्रेकिंगसाठी येत असतात.गोंदिया शहरापासून कचारगड हे ठिकाण साधारणतः ५५ किलोमीटर इतक्या अंतरावर आहे.
नागझिरा वन्यजीव अभयारण्य –
नागझिरा वन्यजीव अभयारण्य हे ठिकाण गोंदिया जिल्ह्यातील एक प्रमुख पर्यटन स्थळ आहे.
नागझिरा अभयारण्य भंडारा अणि गोंदिया ह्या दोन्ही जिल्ह्यांच्या सीमेवर वसलेले आहे.साकोली पासुन हे अभयारण्य २२ किलोमीटर इतक्या अंतरावर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर आहे.
नागझिरा अभयारण्य हे निसर्ग परंपरेने नटलेले ठिकाण आहे.हया अभयारण्यात आपल्याला अनेक पक्षी तसेच प्राणी देखील पाहावयास मिळतात.
नागझिरा वन्यजीव अभयारण्यात बिबटया,रानगवा, रानकुत्री,चौसिंगा,सांबर,गीरगाय,चितळ इत्यादी अनेक वेगवेगळ्या प्रकारची वन्यजीव प्राणी आढळून येतात.
नवेगाव राष्ट्रीय उद्यान –
नवेगाव राष्ट्रीय उद्यान हे गोंदिया जिल्ह्यातील एक प्रमुख पर्यटन स्थळ आहे.
नवेगाव राष्ट्रीय उद्यान गोंदिया जिल्ह्यातील दक्षिण भागात वसलेले आहे.नवेगाव राष्ट्रीय उद्यान १३४ चौरस किलोमीटर इतक्या क्षेत्रात पसरलेले आहे.
निसर्ग संवर्धनाच्या दृष्टीने ह्या उद्यानाला विशेष महत्त्व प्राप्त आहे.हया उद्यानात अनेक प्रकारचे प्राणी पक्षी आढळतात.
नवेगाव राष्ट्रीय उद्यान मध्ये आपल्याला वाघ, बिबट्या,जंगली मांजर,लांडगा,जंगली कुत्रे इत्यादी प्राणी पाहावयास मिळतात.
गोंदिया शहरापासून नवेगाव राष्ट्रीय उद्यान हे जवळपास ६५ किलोमीटर इतक्या अंतरावर आहे.