कृष्णा नदीच्या काठावर वसलेला सांगली जिल्हा पर्यटकांसाठी एक विशेष स्थान म्हणून ओळखला जातो.
सांगली जिल्ह्याला हळदी उत्पादन केंद्र तसेच मराठी नाटकाचे जन्मस्थान म्हणून देखील ओळखले जाते.
आजच्या लेखात आपण सांगली जिल्ह्यातील महत्वाच्या पर्यटन स्थळांविषयी माहीती जाणुन घेणार आहोत.
गणपती मंदिर –
सांगली शहरातील गणपती मंदिर हे आप्पासाहेब पटवर्धन यांनी १९४३ मध्ये बांधले होते.फक्त हिंदुच नव्हे इतर धर्मातील भाविक देखील ह्या मंदिरात दर्शनासाठी रोज हजारोंच्या संख्येने उपस्थित असतात.
आमराई –
आमराई ही सांगली मधील सर्वात मोठी बाग आहे जी चारशे वर्षापुर्वी श्रीमंत आप्पासाहेब पटवर्धन यांनी वसवली होती येथे मोठ्या प्रमाणात असलेल्या आंब्यांच्या झाडांमुळे त्या ठिकाणाला आमराई असे नाव देण्यात आले होते.
हे ठिकाण जवळपास १५ एकरपेक्षा अधिक क्षेत्रात पसरलेले आहे.येथे असलेली औषधी मुल्याची विविध झाडे अणि झुडुपे अशा एकुण तब्बल २०० प्रकारच्या वनस्पतींचा यात समावेश करण्यात आला आहे.
सांगली किल्ला –
सांगली किल्ला हे सांगली जिल्ह्यातील महत्वाचे ठिकाण आहे.हा किल्ला शहराच्या अगदी मधोमध आहे.
सांगली किल्ल्यात कलेक्टर आॅफिस,मराठी कार्यालय स्कुल,वस्तुसंग्रहालय,मुलींचे वसतिगृह राजवाडा महल इत्यादी देखील आहे.
सागरेश्वर अभयारण्य –
सागरेश्वर अभयारण्य हे ठिकाण सागरेश्वर ह्या डोंगरावर वसलेले पर्यटकांचे विशेष आकर्षणाचे केंद्र ठरते.
अनेक प्रकारचे वृक्ष तसेच प्राणी आपणास ह्या अभयारण्यात आढळतात.
कंधार धबधबा –
सांगली शहरापासून सात ते आठ किलोमीटर इतक्या अंतरावर असलेला कंधार धबधबा चांदोली प्राणी संग्रहालयाच्या मध्यभागी स्थित आहे.
घनदाट जंगलाने वेढलेला हा धबधबा यु आकाराच्या टेकडीने सुरू होताना दिसुन येतो.दर वर्षी पावसाळा संपल्यावर पर्यटकांची प्रचंड गर्दी इथे आपणास पाहावयास मिळते.
दंडोबा हिल स्टेशन –
सांगली मधील निरस तालुक्यात जयसिंग गावाच्या हद्दीतील डोंगरावर महादेवाचे मंदिर दिसुन येते.हया ठिकाणी डोंगरावर मोठ्या प्रमाणात घनदाट झाडी दिसुन येतात.
दंडोबाच्या डोंगरावर २० कडकलिंगी पासुन पडतो असे येथील स्थानिक लोकांकडून सांगितले जाते.
हरिपुर कृष्णा घाट –
सांगली पासुन अत्यंत जवळच हरिपुर येथे कृष्णा अणि वारणा ह्या दोन नदींचा संगम होताना आपणास दिसून येतो.
ह्या ठिकाणी आपणास अत्यंत प्रसिद्ध असे संगमेश्वराचे मंदिर देखील दिसुन येते.हे ठिकाण इथे भेट देण्यासाठी आलेल्या पर्यटकांसाठी शांत अणि रमणीय असे आहे.
चांदोली अभयारण्य –
महाराष्ट्रातील सातारा,सोलापूर,अणि सांगली ह्या तीन जिल्ह्यांत हे अभयारण्य विस्तारलेले आहे.
ह्या अभयारण्याला युनेस्कोच्या वतीने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आले आहे.चांदोली अभयारण्यात पर्यटकांना वाघ,बिबटया,गौर,सांबर,काळे हरिण इत्यादी प्रकारचे प्राणी आढळून येतात.
रामलिंग बेट –
सांगली मधील माळवा तालुक्यात तसेच इस्लामपूर पासुन १० किलोमीटर इतक्या अंतरावर कृष्णा नदीच्या पात्रात हे बेट वसलेले आहे.
रामलिंग बेट ह्या ठिकाणी मनाला अगदी शांत अणि उत्साही वाटते.
बाहुबली किल मंदीर –
सांगली मध्ये त्रषी बाहुबली यांचा २८ फूट इतका लांब संगमरवरचा पुतळा आहे.हा पुतळा ह्या ठिकाणाचे विशेष स्थान बनलेला आहे.
सांगली मध्ये फिरण्यासाठी गेल्यावर पर्यटकांनी ह्या ठिकाणाला एकदा नक्की भेट द्यायला हवी.
मीरासाहेब दर्गा –
ख्वाजा शमशुदीन मीरासाहेब दर्गा हे सांगली मधील हिंदु मुस्लिम भक्तांचे विशेष श्रद्धास्थान म्हणून ओळखले जाते.
मीरज रेल्वे स्थानकापासून मीरज शहरात एक किलोमीटर इतक्या अंतरावर ही दर्गा आपणास पाहावयास मिळते.
सांगली जिल्ह्यातील इतर महत्वाची पर्यटन स्थळे –
- श्री दत्त मंदिर
- बाहुबली
- इस्काॅन अरवडे श्री राधा गोपाळ मंदीर
- इरवीन ब्रीज