PW business success story : फिजिक्स वाला स्टार्ट अप व्यवसायाची पशोगाथा

PW business success story

आपण जर जीवनात कठोर परिश्रम घेतले तर आपल्या कठोर परिश्रमापुढे मोठमोठी संकटे देखील नांगी टाकत असतात.
याचे एक उत्तम उदाहरण आहे प्रसिद्ध एडोटेक कंपनी फिजिक्स वालाचे संस्थापक अलख पांडे.1.1 बिलियन डॉलर्सची कंपनी उभी केलेल्या अलख पांडेचे आयुष्य संघर्षाने भरलेले होते.
अलख पांडे अवघ्या सहाव्या इयत्तेत शिकत असताना त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला होता. PW business success story

घरातील कर्ता पुरुष गमावल्याने कुटुंबाची आर्थिक परिस्थिती खूप खराब झाली. ज्यामुळे अलख पांडे यांनी आठव्या इयत्तेत शिकत असतानाच घर चालवण्यासाठी ट्युशन घेणे सुरू केले.
2010 मध्ये विशा०पॅ जा०न्सन घ्या शाळेतुन बारावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी कानपूर येथील इंजिनिअरिंग महाविद्यालयात प्रवेश घेतला.
पण अलख पांडे यांनी इंजिनिअरिंगचे शिक्षण अर्धवट सोडून दिले अणि ते पुन्हा आपल्या मातृभुमीत प्रयाग राज येथे आले.

अणि फक्त पाच हजार रुपये इतके मासिक वेतन घेऊन एका खासगी कोचिंग क्लास मध्ये मुलांना शिकवण्यास त्यांनी सुरुवात केली.
पुढे 2016 मध्ये त्यांनी फिजिक्स वाला नावाने स्वताचे एक युटयुब चॅनल सुरु केले. हया चॅनलवर त्यांनी आपल्या लेक्चरचे व्हिडिओ अपलोड केले. पुढे कोरोना काळात आनलाईन शिक्षणाची मागणी लक्षात घेऊन त्यांनी स्वताचे एक अॅप ला चे केले.

अलख पांडे यांनी जेव्हा त्यांचे युट्यूब चॅनल सुरु केले तेव्हा त्यांच्या व्हिडिओला फक्त एक दोन लाईक्स प्राप्त होत होते.
पण आज अलख पांडे यांच्या फिजिक्स वाला अॅपला प्ले स्टोअर वरून एक करोड पेक्षा जास्त युझर्सने डाऊनलोड केले आहे.फिजिक्स वाला युनिका नॅ स्टार्ट अप कसे बनले? PW business success story

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top